रत्नागिरी -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, सीईटीच्या परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागाला घ्याव्याच लागतील. याच परीक्षांसंदर्भातील अंतिम बैठक व्हीसीद्वारे आज ( मंगळवार)12 वाजता होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
सीईटी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक येत्या दोन दिवसात - उदय सामंत
येत्या दोन दिवसांमध्ये परीक्षांचं वेळापत्रक काय असेल, परीक्षा कधी होणार आहेत, कुठली परीक्षा कधी होणार, सीईटीची परीक्षा कधी असेल, हे सर्व युजीसीच्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही फायनल करू आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
उदय सामंत
मंत्री उदय सामंत आणि सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे. त्यानंतर बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे दिला जाणार आहे. आणि येत्या दोन दिवसांमध्ये परीक्षांचं वेळापत्रक काय असेल, परीक्षा कधी होणार आहेत, कुठली परीक्षा कधी होणार, सीईटीची परीक्षा कधी असेल, हे सर्व युजीसीच्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही फायनल करू आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.