महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरीत - निसर्ग वादळ रत्नागिरी

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात येत आहे.

रत्नागिरी वादळ
रत्नागिरी वादळ

By

Published : Jun 13, 2020, 10:33 PM IST

रत्नागिरी - जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेशकुमार गांता (भाप्रसे), सहसचिव (ॲडमिनीस्ट्रशन आणि सीबीटी) एनडीएमए, एमएचए, नवी दिल्ली हे असणार आहेत. त्यांच्यासोबत आर. बी. कौल, सल्लागार, वित्त मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली, एन.आर.एल.के. प्रसाद, संचालक, ऊर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली, एस.एस.मोदी, उपसचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली, आर.पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, आंशुमली श्रीवास्तव, मुख्य अभियंता, विभागीय कार्यालय, रस्ता वाहतूक मार्ग विभाग, मुंबई हे पथकात असणार आहे.

बुधवारी 17 जून रोजी 10.00 वाजता पथक मंडणगड येथे येणार आहे. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता आंबडवे येथे आगमन व नुकसानीची पाहणी, सकाळी 11.00 वाजता शिगवण येथे आगमन व नुकसानीची पाहणी, सकाळी 11.55 वाजता केळशी येथे आगमन व नुकसानीची पाहणी, दुपारी 12.30 वाजता आडे येथे आगमन व नुकसानीची पाहणी, दुपारी 01.10 वाजता पाजपंढारी येथे आगमन व नुकसानीची पाहणी, दुपारी 01.50 वाजता दापोली येथे आगमन व राखीव, दुपारी 02.50 वाजता दापोली येथून मुरूड, दापोलीकडे प्रस्थान, दुपारी 03.05 वाजता मुरूड येथे आगमन व नुकसानीची पाहणी, दुपारी 03.35 वाजता कर्दे येथे आगमन व नुकसानीची पाहणी, सायंकाळी 04.30 दापोली येथे आगमन व जिल्हाधिकारी यांचे सादरीकरण आणि दापोली येथे राखीव व मुक्काम, असा दौरा या पथकाचा असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details