रत्नागिरी - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली तालुक्यातील मुरुड येथील एका रिसॉर्टच्या संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी आज नागपूर येथील कोस्टल झोन मॅनेजमेन्ट अँथोरिटीच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी दुपारी मुरुड येथे येऊन या रिसॉर्टच्या परिसराची पाहणी केली असून छायाचित्रणही केले आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथे राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी 42 गुंठे जमीन पुणे येथील विभास साठे यांचेकडून विकत घेतली होती व सदर जागा उद्योजक सदानंद कदम यांना 30 डिसेंम्बर 2020 ला विकली होती. या जागेत एक रिसॉर्ट बांधण्यात आले असून या रिसॉर्टच्या संदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेटही घेतली होती. रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे पालन करण्यात आले नसल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती.