महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरील 11 गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय - गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनची गर्दी

01033/34 छ.शि.म.ट - रत्नागिरी - पनवेल ही गाडी 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री धावणार आहे.  ही गाडी रत्नागिरीकरांसाठी अत्यंत सोईची आहे. त्यामुळे या गाडीचा वापर केल्यास पहाटे सुटणाऱ्या दादर पॅसेंजरवरील भार हलका होईल. यामुळे रत्नागिरी - पनवेल गाडीचा वापर जास्तीत जास्त प्रवाशांनी करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरील 11 गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय

By

Published : Aug 22, 2019, 1:51 PM IST

रत्नागिरी -गणेशोत्सवासाठी कोकणात लाखोंच्या संख्येने चाकरमानी येत असतात. मात्र रेल्वे, एसटी बसेस या कालावधीत नेहमीच फुल्ल असतात. त्यामुळे अनेक चाकरमानी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावची वाट धरतात. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 11 गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने 8 तर पश्चिम रेल्वेने 3 गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरील 11 गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय

01033/34 छ.शि.म.ट - रत्नागिरी - पनवेल ही गाडी 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री धावणार आहे. ही गाडी रत्नागिरीकरांसाठी अत्यंत सोईची आहे. त्यामुळे या गाडीचा वापर केल्यास पहाटे सुटणाऱ्या दादर पॅसेंजर वरील भार हलका होईल. यामुळे रत्नागिरी - पनवेल गाडीचा वापर जास्तीत जास्त प्रवाशांनी करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले.

ध्य रेल्वेने डबे वाढवलेल्या गाड्या -

1001/02 छ.शि.म.ट - सावंतवाडी - छ.शि.म.ट (आठवड्यातून 5 दिवस ) - 20 चे 22 डबे


01007/08 छ.शि.म.ट. - सावंतवाडी - छ.शि.म.ट (आठवड्यातून 2 दिवस ) - 20 चे 22 डबे


01033/34 छ.शि.म.ट - रत्नागिरी - पनवेल (दररोज ) - 20 चे 22 डबे


01035/36 पनवेल - सावंतवाडी - छ.शि.म.ट (दररोज ) - 20 चे 22 डबे


01431/32 पुणे - रत्नागिरी - पुणे (साप्ताहिक ) - 20 चे 22 डबे


01447/48 पुणे - करमळी - पुणे (साप्ताहिक ) - 20 चे 22 डबे


01433/45 पनवेल - सावंतवाडी - पनवेल (साप्ताहिक) - 20 चे 22 डबे


01047/48 पनवेल - सावंतवाडी - कुर्ला ट. (साप्ताहिक) - 20 चे 22 डबे

ABOUT THE AUTHOR

...view details