महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाणार'प्रकरणी गुन्हे मागे; प्रकल्पग्रस्तांचा जल्लोष - celebration in nanar after decision of withdraw fir

नाणार प्रकल्पातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज (मंगळवार) जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत हा जल्लोष, सागवे येथील कात्रादेवी येथे करण्यात आला.

nanar
नाणार प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर जल्लोष साजरा

By

Published : Dec 3, 2019, 9:24 PM IST

रत्नागिरी- नाणार प्रकल्पातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज (मंगळवार) जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत हा जल्लोष, सागवे येथील कात्रादेवी येथे करण्यात आला. यावेळी प्रकल्पग्रस्त आंदोलक, शिवसेनेचे कार्यकर्ते, रिफायनरी विरोधी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे अशोक वालम, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके उपस्थित होते. याच जल्लोषाचा आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

याच जल्लोषाचा आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

हेही वाचा -पंकजा मुंडेंसोबत भाजपचे 'हे' नेते बंडाच्या तयारीत? गोपीनाथ गडावर होणार शक्तीप्रदर्शन

आरे संदर्भातील गुन्हे मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. 33 जणांवर गुन्हे दाखल होते. मात्र, आता गुन्हे मागे घेण्यात आल्यामुळे आंदोलकांनी नाणार परिसरात जल्लोष केला.

नाणार प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर जल्लोष साजरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाच्या आंदोलनावेळी जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेतले जातील, अशी घोषणा केली आणि नाणारमध्ये जल्लोष सुरू झाला. ढोल ताशाचा गजर करण्यात आला, फटाके फोडण्यात आले, एकमेकांना लाडू वाटण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून इथे संघर्ष सुरू होता. नाणारविरोधात आंदोलन सुरू होते. याच आंदोलनाला आता यश प्राप्त झालं आणि जे गुन्हे दाखल झालेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतलेत. त्यामुळे नाणारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली जात आहे. तसेच असा मुख्यमंत्री वर्षानुवर्ष महाराष्ट्राला लाभो, अशी प्रतिक्रिया यावेळी अशोक वालम यांनी दिली. तर, शिवसेनेचे कार्यकर्ते, आंदोलक एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details