महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओले काजूगर खाताहेत 'भाव', एका किलोला २५०० चा दर

बदलत्या वातावरणामुळे यावर्षी आंबा आणि काजूचा मोसम लांबला असून डिसेंबर महिन्यात मिळणारे ओले काजू जानेवारीत दाखल झाले आहेत. हे काजूगर उशिरा दाखल झाले असले तरी त्यांना सोन्याचा भाव आहे. २० रुपयांना ३ तर किलोला २५०० चा दर असतानाही या काजूगराला मागणी होताना दिसत आहे.

ओले काजूगर बाजारात दाखल
ओले काजूगर बाजारात दाखल

By

Published : Jan 21, 2020, 4:12 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात यावर्षी ओला काजूगर चांगलाच भाव खातोय. काजूच्या बियांना चढा भाव असला तरी खवय्ये मात्र काजूगर खरेदी करताना दिसत आहेत.

बदलत्या वातावरणामुळे यावर्षी आंबा, काजू हंगाम लांबणीवर आहे. त्यामुळे दरवर्षी डिसेंबर महिन्यात दाखल होणारे ओले काजूगर यावर्षी मात्र जानेवारीत दाखल झाले आहेत. हे काजूगर उशिरा दाखल झाले असले तरी त्यांना सोन्याचा भाव आहे. २० रुपयांना ३ तर किलोला २५०० चा दर असतानाही या काजूगराला मागणी आहे.

ओले काजूगर बाजारात दाखल

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या ओल्या काजूगराचा दर १००० ते १४०० रुपये किलो होता. मात्र, यावर्षी सर्व रेकॉर्ड मोडीत काढत काजूने अडीच हजारांच्या घरात उडी घेतली आहे. काजू दराने गगनभरारी घेतली असली, तरी खवय्ये मात्र ओले काजूगर खरेदी करताना दिसून येत आहेत.

हेही वाचा -रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना

खरं तर, बाजारात काजूगराला प्रचंड मागणी आहे. खासकरून ओल्या काजूगरासाठी रत्नागिरीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. यावर्षी काजू पीक कमी असले तरी, चांगले पैसे मिळवून देणार असल्याचे चित्र असल्याने शेतकर्‍यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

हेही वाचा - जिल्ह्यासाठी 350 कोटींची मागणी करणार - पालकमंत्री परब

ABOUT THE AUTHOR

...view details