महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार संजय कदम यांच्यासह २५० जणांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल; 6 जणांना अटक - vidhan sabha election libe update

खेडमध्ये मतदान प्रक्रिया संपल्यानंतर विजयी मिरवणुक काढल्याप्रकरणी आमदार संजय कदम यांच्यासह २५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी संजय कदम आणि खेडेकर यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता त्यांनी मिरवणूक सुरूच ठेवली.

आमदार संजय कदम यांच्यासह २५० जणांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल; 6 जणांना अटक

By

Published : Oct 23, 2019, 6:57 PM IST

रत्नागिरी -मतदान झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढणाऱ्या आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह 250 कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा खेड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये सहभागी असणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

आमदार संजय कदम यांच्यासह २५० जणांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल; 6 जणांना अटक

हेही वाचा -महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : रत्नागिरीत कोण मारणार बाजी?

खेडमध्ये मतदान प्रक्रिया संपल्यानंतर विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी आमदार संजय कदम यांच्यासह २५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी संजय कदम आणि खेडेकर यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता त्यांनी मिरवणूक सुरूच ठेवली.

हेही वाचा -2014 च्या तुलनेत यंदा रत्नागिरीत मतदानाचा टक्का घसरला

पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता विजयी मिरवणूक काढून मोठ मोठ्या घोषणा देत समाजामध्ये दहशत माजवून कायदा व सुव्यवस्थचा प्रश्न त्याच बरोबर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी सायली कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर अशा सुमारे २५० जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि.क, १४३, १४७, १४९, २६८, २९० या सह लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२६ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details