महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विलेपार्लेतून विनापरवाना रत्नागिरीत आलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल - रत्नागिरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू असून संचारबंदीही आहे. मात्र, काही जण नियमांचा भंग करून गावी येत आहेत. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील देवूड येथील महिला २७ एप्रिलला मुंबईच्या विलेपार्ले (पश्चिम) येथून गावी परतली. त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरी पोलीस ठाणे
रत्नागिरी पोलीस ठाणे

By

Published : May 4, 2020, 10:59 AM IST

रत्नागिरी - मुंबईतून रत्नागिरी तालुक्यात आलेल्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक किंवा वैद्यकीय गरज नसतानाही या महिलेने जिल्ह्यात प्रवेश केला. मात्र, कोणतीही संर्पक माहिती न देता प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी या महिलेविरोधात देवूड सरपंचांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून या महिलेविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा साथरोग प्रतिबंधक कायदा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू असून संचारबंदीही आहे. मात्र, काही जण नियमांचा भंग करून गावी येत आहेत. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील देवूड येथील महिला २७ एप्रिलला मुंबईच्या विलेपार्ले (पश्चिम) येथून गावी परतली.

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. मात्र, रत्नागिरीत येण्यासाठी देवूड येथील या महिलेने कौटुंबिक अथवा वैद्यकीय गरज नसतानाही जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांना जाणीवपूर्वक माहिती न देता विलेपार्ले येथून केलेल्या प्रवासाची माहितीही लपवली. त्यांच्याकडे कोणताही ई-पास नव्हता. नातेवाईकांच्या चारचाकीतून आले एवढीच माहिती त्यांनी दिली.

त्यामुळे माहिती न देता प्रशासनाची दिशाभूल केल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात देवूड सरपंचांनी तक्रार दिली. या तक्रारीवरुन चाकरमानी महिलेविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला सध्या संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

हेही वाचा -मजुरांना आपल्या गावी जाण्याची ओढ, परवानगीसाठी गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details