महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नावात साधर्म्य असलेले उमेदवार उभे करणे, ही विरोधकांची राजकीय खेळी - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्या व्यक्तिरिक्त आणखी तीन संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना विचारले असता राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीच ही खेळी आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम

By

Published : Oct 10, 2019, 11:59 PM IST

रत्नागिरी - नावात साधर्म्य असलेले आणखी तीन उमेदवार उभे करणे, ही विरोधकांची राजकीय खेळी आहे. मात्र, ही खेळी विरोधकांच्याच अंगलट येईल, असा विश्वास दापोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांनी व्यक्त केला. संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली


दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्या व्यक्तिरिक्त आणखी तीन संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना विचारले असता राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीच ही खेळी आहे, असे ते म्हणाले. दापोली मतदार संघात मी केलेली कामे आणि मतदारसंघात असलेला माझा संपर्क यामुळे माझा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - सर्व पक्षाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड


अनंत गीतेंच्या पराभवाला रामदास कदमच जबाबदार आहेत. रामदास कदम यांची पक्षावरची निष्ठा संपूर्ण कोकणातील शिवसैनिकांना माहिती आहे, असा टोलाही लगावला. रामदास कदम हे फक्त स्वतःच्या मुलाचा प्रचार करत आहेत. इतर निवडणुकांमध्ये त्यांनी पाडापाडीचे राजकारण केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीदवाक्य होते. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण मात्र, आता मुलांसाठी तिकिट घेऊन हे नेते 100 टक्के राजकारणच करत आहेत. शिवसेनेचे असंख्य नाराज कार्यकर्ते आपल्या संपर्कात असल्याचे कदम यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details