महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरे वारे येथे बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जीवितहानी टळली - बर्निंग कार

गणपतीपुळेहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एका कारने आरेवारे येथील चढावात अचानक पेट घेतला. यात गाडीचालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडीतील सर्व माणसे सुखरुप बाहेर निघाली. तर, कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

ratnagiri
बर्निंग कारचा थरार

By

Published : Dec 17, 2019, 12:45 PM IST

रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गावरील आरे वारे येथे कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, कार या आगीत जळून खाक झाली आहे.

बर्निंग कारचा थरार

सोमवारी रात्री गणपतीपुळेहून रत्नागिरीच्या दिशेने एक मारुती झेन कार येत होती. या कारने आरेवारे येथील चढावात अचानक पेट घेतला. त्यावेळी या गाडीत २ लहान मुलांसह एकूण ६ माणसं होती. मात्र, गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीतील सर्व माणसांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने जीवितहानी टळली, तर कार या आगीत जळून भस्मसात झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details