महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूण : असुर्डे धरणात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह, तालुक्यातील घटना - असुर्डे धरणात बुडून मृत्यू न्यूज

हे तिघेही काल धरण परिसरात लाकडासाठी गेलेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर आज सकाळी त्यांना धरणाच्या पाण्यात तीन मृतदेह तरंगताना दिसले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. धरणाच्या पाण्यात तीन मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी चिपळूण लेटेस्ट न्यूज
रत्नागिरी चिपळूण लेटेस्ट न्यूज

By

Published : Dec 2, 2020, 3:09 PM IST

Updated : Dec 2, 2020, 4:36 PM IST

रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील असुर्डे धरणात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. धरणाच्या पाण्यात तीन मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

असुर्डे धरणात बुडून मृत्यू
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत झालेले तिघेही एकाच घरातील असून यामध्ये आई आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : डोंबिवली एमआयडीसी प्रदूषणाचा प्रश्न जैसे-थे; नागरी वसाहतीला धोका कायम, उपाययोजना कागदावरच

असुर्डे धरणात बुडून मृत्यू

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे तिघेही काल धरण परिसरात लाकडासाठी गेलेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर आज सकाळी त्यांना धरणाच्या पाण्यात तीन मृतदेह तरंगताना दिसले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात सापडल्याने या तिघांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.

हेही वाचा -दाऊद इब्राहिमच्या लोटेतील मालमत्तेचा लिलाव, ग्रामस्थ रविंद्र कातेंनी जिंकली बोली

Last Updated : Dec 2, 2020, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details