रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग वादळाने दणादाण उडवली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे. त्यात समुद्रात अजस्त्र लाटा उसळत आहेत. या लाटांच्या तडाख्यात मिऱ्या समुद्र किनाऱ्याजवळ नांगरून ठेवलेली नौका सापडली आहे. वादळी वारे आणि लाटांच्या तडाख्यात ही नौका भरकटली आहे. या नौकेवर काही खलाशी असल्याची माहिती मिळत आहे. या नौकेला किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
निसर्ग चक्रीवादळ: रत्नागिरीत लाटांच्या तडाख्यात सापडली नौका - miriya jetty news
निसर्ग चक्रीवादळमुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. तर समुद्रामधील लाटा खवळल्या आहेत. त्यात मिऱ्या समुद्र किनाऱ्याजवळ नांगरुन ठेवलेली नौका सापडली आहे.

लाटांच्या तडाख्यात सापडलेली नौका
निसर्ग चक्रीवादळ: रत्नागिरीत लाटांच्या तडाख्यात सापडली नौका
सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे निसर्ग हा चक्रीवादळ कोकण किनापट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रत्नागिरीतून सुमारे तीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळाला घाबरु नका, काळजी घ्या - एनडीआरएफ
Last Updated : Jun 3, 2020, 11:12 AM IST