महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी : लोटे एमआयडीसीतील घराडा कंपनीत स्फोट; चार जणांचा मृत्यू

लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्याच्या प्लांट नंबर ७मध्ये आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अचानक रिऍक्टरचा स्फोट झाला. यामध्ये चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले.

blast in gharada company in lote midc ratnagiri
रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील घराडा कंपनीत स्फोट

By

Published : Mar 20, 2021, 11:36 AM IST

Updated : Mar 20, 2021, 2:27 PM IST

रत्नागिरी -लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत आज झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. कंपनीच्या 7 नंबर प्लांटमध्ये हा स्फोट झाला. दरम्यान जवळपास दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, जेव्हा ही दुर्घटना घडली, ती वेळ सकाळच्या नाश्त्याची असल्याने प्लॅन्टमधील बरेचसे कामगार नाश्त्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.

घटनास्थळावरची दृश्ये.

सकाळी झाला रिऍक्टरचा स्फोट -

लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्याच्या प्लांट नंबर ७मध्ये आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अचानक रिऍक्टरचा स्फोट झाला. यामध्ये चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले. दुर्घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ हालचाल करत जखमी कामगारांना मुंबई ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न केले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या आणखी दोन कामगारांचा वाटेतच मृत्यू झाला.

हेही वाचा -सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ.. हिरेन मृत्यू प्रकरण एनआयएकडे !

दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण -

घटनेची माहिती मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कारखान्यात प्रवेश करण्यात मनाई केल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या प्रवेशद्वारावरच थांबावे लागले. कंपनी व्यवस्थापनाने स्वतःच्या अग्निरोधक यंत्रणेने सुमारे दिड तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा -कोरोना रोखण्यासाठी मुंबईकरांची साथ हवी; महापौरांनी व्यक्त केली अपेक्षा

Last Updated : Mar 20, 2021, 2:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details