रत्नागिरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळाला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज "कश्तियां डूब जाती है और घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है" असं ट्विट केलं होतं. त्यावर "किसकी हस्तियाँ कब डूबेगी हे 2022 ते 2024 दरम्यान कळेलच" असं म्हणत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
या ट्विट वरून भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खा. राऊत यांच्यासह शिवसेनेला फटकारलं आहे. लाड म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी एक-दीड वर्षांपूर्वी शिवसेनेबरोबर जे काही झालं ती सत्य परिस्थिती लोकांसमोर ठेवली, हस्तियाँ किसकी कब कब डूबेगी हे शिवसेनेला 2022 ते 2024 पर्यंत होणाऱ्या निवडणुकांमध्ये कळेल. ही महाराष्ट्राची जनता त्यांना दाखवून देईल. कारण स्वाभिमान विकलेली, तत्वनिष्ठा विकलेली, स्वतःचं अस्तित्व संपलेली शिवसेना आज महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलीय, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत खा. संजय राऊत साहेबांना उत्तर आम्ही 2022 ते 2024 च्या कालावधीत देऊ. असे लाड म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने महाविकासआघाडीला जागा दाखवली..