रत्नागिरी- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान भाजपने कोकणातील उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली असून रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुकांच्या शुक्रवारी मुलाखती देखील घेण्यात आल्या. पक्ष निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस आ.सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली या मुलाखती घेण्यात आल्या.
पडघम विधानसभेचे.. रत्नागिरीत भाजपकडून ५ विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांच्या मुलाखती - ratnagiri
गेल्या वेळी भाजप-शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यावेळी जिल्ह्यात ५ पैकी ३ आमदार शिवसेनेचे निवडून आले. तर सिंधुदुर्गमध्ये ३ पैकी २ आमदार शिवसेनेचे निवडून आले होते. दरम्यान यावेळी मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातून एकूण २५ इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघातून एकूण २५ इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले. गेल्या वेळी भाजप-शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यावेळी जिल्ह्यात ५ पैकी ३ आमदार शिवसेनेचे निवडून आले. तर सिंधुदुर्गमध्ये ३ पैकी २ आमदार शिवसेनेचे निवडून आले होते. दरम्यान यावेळी मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड यांच्या साथीने भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन आणि पदाधिकाऱ्यांनी सध्या पक्ष बांधणीवर भर दिला आहे. काहीच दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या एकमेव सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर जिल्ह्यात इतर ठिकाणीही अनेक जण भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद सध्या वाढताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान पक्षनिरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस आ.सुरेश हळवणकर यांनी आज इच्छुकांच्या मुलाखती घेत त्यांची मत जाणून घेतली. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करीत आहेत. एका विधानसभा मतदार संघातून अनेकजण इच्छुक आहेत. जागा वाटपात जो मतदार संघ भाजपला मिळेल त्या मतदार संघातील इच्छुकांमधून उमेदवार दिला जाईल. कोणीही बंडखोरी करणार नाही, याची खात्री सर्व इच्छुकांनी दिली असल्याचे ऍड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले आहे.