महाराष्ट्र

maharashtra

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक; भाजपने प्रचारात उतरवले मातब्बर नेते

रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपची नंबर १ ची फळी पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरली आहे.

By

Published : Dec 27, 2019, 4:54 AM IST

Published : Dec 27, 2019, 4:54 AM IST

ratnagiri
प्रचार फेरीचे दृश्य

रत्नागिरी- रत्नागिरी नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपने मातब्बर नेते उतरवले आहेत. भाजपचे काही बडे नेते रत्नागिरी शहरात तळ ठोकून आहेत. त्यामुळे, राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे.

प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपची नंबर १ ची फळी पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरली आहे. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रत्नागिरीतील प्रचार फेरीत सहभाग घेतला. बस स्थानक येथून या प्रचार फेरीला सुरुवात झाली होती. प्रचार फेरीत माजी खासदार नीलेश राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड, माजी आमदार बाळासाहेब माने, उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, भाजप प्रदेश सदस्यांचा देखील समावेश होता. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

दरम्यान, रत्नागिरी नगरपालिकेची ही लादलेली निवडणूक आहे. आणि या निवडणुकीत भाजप पक्ष जिद्दीने उतरला आहे. शहरातील विकासाची अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीसाठी मंजूर केलेल्या नळपाणी योजनेचे काम १० टक्के देखील झाले नाही. या सर्व राहिलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा-रत्नागिरीत मद्य व्यावसायिकांना भरारी पथकाचा दणका; 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details