रत्नागिरी -सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी सुरू करण्यात येत आहे. मराठा समजाच्या या लढ्याला भाजपाने आपला राजकीय पाठिंबा जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवरमराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळप्रसंगी खळखट्याक करू, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिला आहे. ते शनिवारी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळप्रसंगी खळखट्याक करू - प्रसाद लाड - obc reservation news
जोपर्यंत हे सरकार आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला टाइमबॉण्ड प्रोग्राम देणार नाही, तोपर्यंत मराठा समाजाच्या मागे ताकदीने उभं राहू, वेळप्रसंगी समाजाच्या बरोबर आंदोलन करावे लागले तर आंदोलन आणि खळखट्याक करावा लागला, तर खळखट्याकही करण्याची भारतीय जनता पार्टीची तयारी आहे, असा इशारा लाड यांनी सरकारला दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रसाद लाड
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, तसेच इतर मागासवर्गीयांना धक्का न लावता 50 टक्केच्यावर 13 टक्केचं जे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, ते आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्याचा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण प्रयत्न असेल, असेही लाड यावेळी म्हणाले.