रत्नागिरी - खासदार संभाजीराजे छत्रपतींनी जो काही निर्णय घ्यावा, तो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हिताचा घ्यावा, असे मत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केले आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात आंदोलन आणि रण पटविण्याचं काम आम्ही करू आणि नुसतं आंदोलन करणार नाही तर वेळप्रसंगी याहीपेक्षा मोठे पाऊल उचलायला लागले तर आम्ही उचलू, आणि त्याला जबाबदार हे सरकार असेल, असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला आहे. ते आज खेडमध्ये मराठा नेत्यांशी संवाद साधल्यावर माध्यमांशी बोलत होते.
जो निर्णय घेतील तो मराठा समाजाला आरक्षण मिळेल यासाठी घ्यावा - प्रसाद लाड
खासदार संभाजीराजे आज आपली भूमिका मांडणार आहेत. याबाबत प्रसाद लाड म्हणाले की, छत्रपती संभाजी राजेंबद्दल राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला, समाजातील कार्यकर्त्याला, प्रत्येक समाजातील माणसाला आदर आहे. ते जो निर्णय घेतील तो मराठा समाजाला आरक्षण मिळेल यासाठी घ्यावा. कारण त्यांची राज्यसभेतील खासदारकी देखील मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना दिलेली होती, ते त्यांनी लक्षात ठेवावं आणि मराठा समाजाच्या हितासाठी त्यांनी प्रयत्न करावा ही माझी त्यांना विनंती असल्याचे प्रसाद लाड यावेळी म्हणाले.
संभाजीराजे जो काही निर्णय घेतील तो मराठा आरक्षणाच्या हिताचा घ्यावा - प्रसाद लाड - भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड
खासदार संभाजीराजे छत्रपतींनी जो काही निर्णय घ्यावा, तो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हिताचा घ्यावा, असे मत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केले आहे. त्यांची राज्यसभेतील खासदारकी देखील मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना दिलेली होती, ते त्यांनी लक्षात ठेवावं आणि मराठा समाजाच्या हितासाठी त्यांनी प्रयत्न करावा असे लाड म्हणाले.
यावेळी प्रसाद लाड म्हणाले की, आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, ते आरक्षण कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळावे यासाठी भाजपने समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्हा दौरे सुरू आहेत. या आरक्षणासाठी भाजप संघर्ष करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आरक्षणासाठी जर आंदोलन करावं लागलं, संघर्ष करावा लागला तर भाजप क्रांती मोर्चाच्या मागे खंबीरपणे उभी राहिल, असे प्रसाद लाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
..तर त्याला जबाबदार राज्य सरकार असेल -
दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारच्या विरोधात आंदोलन आणि रण पेटविण्याचे काम आम्ही करू आणि नुसते आंदोलन करणार नाही तर वेळप्रसंगी याहीपेक्षा मोठे पाऊल उचलायला लागले तर आम्ही उचलू, आणि त्याला जबाबदार हे सरकार असेल, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.