रत्नागिरी -जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेची ही अवस्था असेल तर या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी थेट राज्यपाल नियुक्त प्रशासक नेमावा, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी राज्यपालांकडे करण्यात आली. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे.
राज्यपालांनी रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासक नेमावा, प्रसाद लाड यांचं राज्यपालांना पत्र - भाजप नेते प्रसाद लाड न्युज
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठ ते नऊ दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत तब्बल 52 वर पोहोचली होती. त्यामुळेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाची अगतिकता व्यक्त केली होती. भाजपने नेमका हाच मुद्दा आता थेट राज्यपालांपर्यत नेला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठ ते नऊ दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत तब्बल 52 वर पोहोचली होती. त्यामुळेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाची अगतीकता व्यक्त केली होती. भाजपने नेमका हाच मुद्दा आता थेट राज्यपालांपर्यत नेला आहे. रत्नागिरीप्रमाणे राज्यातील रेड झोनमध्ये अशाच प्रकारे राज्यपाल नियुक्त प्रशासक नेमावा, अशी मागणी देखील प्रसाद लाड यांनी केली आहे. त्याशिवाय प्रत्येक आमदारांनी ५० लाख रुपये आमदार निधी दिला, तर साडेतीन ते चार कोटी रुपयांचा निधी उभा राहू शकतो. यातून जवळपास ५०० खाटांचे विलगीकरण केंद्र उभे राहू शकते असेही प्रसाद लाड यांनी सष्ट केले आहे.