रत्नागिरी -संजयराऊत यांचा शब्द लिहिताना चुकला आहे, त्यांना छंद नव्हे तर, चंदा लिहायचे असेल. कारण चंदा हाच त्यांचा धंदा आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड ( prasad lad criticize Sanjay Raut ) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.
prasad lad criticize Sanjay Raut - संजय राऊत यांना छंद नसून चंदा लिहायचे असेल, कारण तोच त्यांचा धंदा - भाजप नेते प्रसाद लाड - चंदा टीका प्रसाद लाड
संजय राऊत यांचा शब्द लिहिताना चुकला आहे, त्यांना छंद नव्हे तर, चंदा लिहायचे असेल. कारण चंदा हाच त्यांचा धंदा आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड ( prasad lad criticize Sanjay Raut ) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.
प्रसाद लाड यांनी सामान्यातील रोखठोकवरून आज शिवसेनेला लक्ष्य केले. लाड यांनी थेट शिवसेनेच्या बाण्यावरच भाष्य केले. ठाकरी बाणा केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यात होता, आता ठाकरी बाण्यात काही दम राहिलेला नाही, अशी टीका देखील लाड ( prasad lad ) यांनी केली.
चंदा गोळा करणे हाच त्यांनी धंधा बनवला आहे. रोखठोकमधून लिहून काही फरक पडत नाही. सामना 5 हजार वाचक तरी वाचतात का? त्यामुळे संजय राऊत रोखठोकमधून काय लिहितात याचा जनतेवर काही फरक पडत नाही, अशी टीका प्रसाद लाड ( prasad lad criticize ) यांनी यावेळी केली.
हेही वाचा -'राजकारणातील भविष्यवाणी करण्याचा ठेका फक्त नारायण राणे यांनीच घेतलाय' - खासदार विनायक राऊत