रत्नागिरी -अनिल देशमुख प्रकरणात अनेक नावे बाहेर निघतील, त्या भितीपोटी राष्ट्रवादीवाले आता विस्कटले असून त्या अवस्थेत ते आरोप करत असल्याची टीका भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आज (दि. 25 एप्रिल) रत्नागिरीत भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
न्यायालय बीजेपीची एजन्सी आहे का..?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सीबीआयने शनिवारी (दि. 24 एप्रिल) छापेमारी केली. यावरून भाजप सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआला परवानगी न्यायालयाने दिली आहे. न्यायालय भाजपची एजन्सी आहे का? न्यायालयानेच चौकशीचे आदेश दिलेत, त्यामुळे चौकशी तर झालीच पाहिजे. त्याच्यात आता अनेक नावे निघतील त्या भीतीपोटी राष्ट्रवादीवाले आता विस्कटलेत. उद्या जर बाकीची नावे निघाली, तर ती नावे कुठपर्यंत जातील याचा अंदाज त्यांना आहे, म्हणून ते सर्व विस्कटलेल्या अवस्थेत टीका करत असल्याचे राणे यावेळी म्हणाले.
हेही वाचा -जिल्ह्यात सद्यस्थितीला ३०५२ बेड उपलब्ध, रेमडेसिवीरची कमतरता भासणार नाही - मंत्री उदय सामंत
हेही वाचा -प्रशासनाने 'आरटी-पीसीआर' टेस्टवर भर द्यावा - नीलेश राणे