महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किरीट सोमैया दापोली मुरुडमधील शिवसेना नेत्यांच्या अनधीकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक - रत्नागिरी शहर बातमी

मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील बंगल्याच्या बांधकामाविरोधात केंद्रीय ग्रीन ट्रिब्युनरमध्ये भाजप नेते किरीट सोमैया यांनी याचिका दाखल केली आहे.

म

By

Published : Aug 17, 2021, 10:00 PM IST

Updated : Sep 10, 2021, 1:46 PM IST

रत्नागिरी -मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील बंगल्याच्या बांधकामाविरोधात केंद्रीय ग्रीन ट्रिब्युनरमध्ये भाजप नेते किरीट सोमैया यांनी याचिका दाखल केली आहे. नार्वेकर यांच्या बंगल्याचे सुरू असलेले हे बांधकाम तोडण्यात यावे, अशी मागणी सोमैया यांनी केली आहे.

बोलताना किरीट सोमैया

सोमैया मंगळवारी (दि. 17 ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील बंगल्याची त्यांनी आज पाहाणी केली. याठिकाणी जाऊन मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत सोमैया यांनी इथे सेल्फी देखील काढला.

अनधिकृत बांधकामाबाबत केंद्रीय ग्रीन ट्रिबुनरमध्ये खटला दाखल केल्याची माहिती यावेळी सोमैया यांनी दिली. या खटल्याच्या सुनावलीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री ऍड. अनिल परब यांचे रिसॉर्ट आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत असल्याचा दावा किरीट सोमैया यांनी केला आहेत. अनधिकृत बांधकामासंदर्भात ग्रीन ट्रिब्युनरमध्ये अतिरिक्त अफीडेव्हीट दाखल करण्यासाठी प्रत्यक्ष या अनाधिकृत बांधकामाची पाहाणी करण्यासाठी आपण इथे आल्याची माहिती सोमैया यांनी दिली.

परब आणि नार्वेकर यांच्या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई का नाही

दरम्यान, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुनही पालकमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर कारवाई का झाली नाही, यावरून किरीट सोमैया आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. किरीट सोमैया यांनी थेट मुरुडची ग्रामपंचायत गाठली आणि येथील तलाठ्यांना या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले. त्यानंतर थेट तहसीलदार कार्यालय गाठत किरीट सोमैया यांनी तहसीलदार यांना यावर कधी कारवाई होणार यासाठी त्यांनासुद्धा धारेवर धरले.

हेही वाचा -...तर 90 टक्के पूर्ण झालेल्या कामाचं श्रेय शिवसेनेला मिळालं पाहिजे - भास्कर जाधवांचा गडकरींना टोला

Last Updated : Sep 10, 2021, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details