महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक-एन्ड लॉकडाऊनमुळे एसटी विभागाचा मोठा तोटा - S.T. Department Ratnagiri

रविवारी दिवसभरात फक्त ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रूपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे.

एसटी विभागाचा तोटा
एसटी विभागाचा तोटा

By

Published : Apr 15, 2021, 4:34 PM IST

रत्नागिरी- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, शासनाने दोन दिवस विक-एन्ड लॉकडाऊन घोषित केला होता. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. मात्र प्रवाशांअभावी रत्नागिरीच्या वाहतूक विभागावर चांगलाच परिणाम झाला आहे. रविवारी दिवसभरात फक्त ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रूपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे.

विकेंड लॉकडाऊनमुळे एसटी विभागाचा मोठा तोटा
एसटीच्या उत्पन्नावर परिणामलॉककडाऊननंतर एसटीची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली असतानाच, आता पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. एस. टी.ला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. असे असले तरी प्रवासी नसल्यामुळे एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रूपयांचा तोटारत्नागिरी विभागात ६०० गाड्यांद्वारे दैनंदिन ४२०० फेऱ्या सोडण्यात येतात. एक लाख ८० हजार किलोमीटर प्रवासातून एस.टी.ला ५० लाखांचे उत्पन्न मिळतं. जेमतेम डिझेल खर्च भागत असला तरी स्पेअर पार्ट्स व अन्य खर्चासाठी महामंडळाकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. विक-एन्डमुळे शनिवारी दिवसभरात अवघ्या १६० फेऱ्या संपूर्ण विभागातून सोडण्यात आल्या होत्या. १९ हजार ५०१ किलोमीटर इतकाच प्रवास झाला आहे. त्यामुळे दोन दिवसात २४ लाख ६४३१ रूपयांचे उत्पन्न लाभले आहे. मात्र दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रूपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details