महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुरामुळे चिपळून शहरात मगरींचे आगमन; चार मगरींना पकडण्यात वनविभागाला यश - flood

बुधवारी सकाळी चिपळूण शहरातल्या नगर परिषदेच्या मागच्या बाजूला एका व्यापारी संकुलाच्या आवारात 8 फुटाची मगर आढळली होती. वनविभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी पिंजऱ्यासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर वनविभागाने मोठ्या शिताफीने मगरीला जेरबंद केले व तिला वाशिष्ठी नदीमध्ये सोडून दिले.

मगरींना पिंजऱ्यात कैद करताना वनविभागाचे कर्मचारी

By

Published : Aug 8, 2019, 3:03 AM IST

रत्नागिरी- चिपळूणमध्ये आलेल्या महापुराचा फटका नदीतल्या मगरींना देखील बसला आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून चिपळून शहरात मगरी शिरल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४ मगरींना पकडून सुखरूप सोडून देण्यात वन विभागाला यश आले आहे.

पुरामुळे चिपळून शहरात मगरींचे आगमन

बुधवारी सकाळी चिपळूण शहरातल्या नगर परिषदेच्या मागच्या बाजूला एका व्यापारी संकुलाच्या आवारात 8 फुटाची मगर आढळली होती. वनविभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी पिंजऱ्यासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर वनविभागाने मोठ्या शिताफीने मगरीला जेरबंद केले व तिला वाशिष्ठी नदीमध्ये सोडून दिले. त्यानंतर मंगळवारी देखील एक भली मोठी मगर चिपळूण रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवरआली होती. या महाकाय मगरीला पाहून रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

चिपळूण वन विभागाचे कर्मचारी रामदास खोत, किरण पाटील व प्रथमेश गावडे या तिघांच्या चमूने आत्तापार्यंत ४ मगरींना पकडून जीवदान दिले आहे. चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक भागात मगरी व त्यांची पिल्ल दिसत आहे. त्यामुळे शहरातील रहिवाशांना मगर दिसून आल्यास त्यांनी वनविभागाला तात्काळ कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details