महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना : एकाच कुटुंबातील पाच जणांवर काळाचा घाला - दुर्घटना

तिवरे धरणाच्या शेजारी राहणारे अनंत चव्हाण त्यांचे दोन भाऊ कामानिमित्त शहरात असतात.

चव्हाण कुटूंंबीय घटनेविषयी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला माहिती देताना.

By

Published : Jul 4, 2019, 3:23 PM IST

रत्नागिरी - येथील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांवर काळाने घाला घातला आहे. त्यामध्ये तिवरे धरणाच्या शेजारी भेंद वाडीत अनंत चव्हाण यांच्यासोबत त्याचे संपुर्ण कुटूंब वाहून गेले आहे. अनंत चव्हाण हे तीन भावांचे एकत्र कुटूंब होते. मात्र, त्यातील एका भावाचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाल्याने अनंत चव्हाण यांचे भाऊ व इतर कुटुंबीय कोलमडून गेले आहे.

एकाच कुटुंबातील पाच जणांवर काळाचा घाला ; चव्हाण कुटुंबीय उध्वस्त

तिवरे धरणाच्या शेजारी भेंद वाडीत अनंत चव्हाण यांचे कुटूंब राहत होते. त्यांचे दोन भाऊ कामानिमित्त शहरात असतात. या दुर्घटनेमध्ये अनंत चव्हाण यांच्यासह त्यांची पत्नी अनिता चव्हाण, मुलगा रणजित चव्हाण, सून ऋतुजा रणजित चव्हाण आणि दीड वर्षांची नात दुर्वा रणजित चव्हाण वाहून गेले. आनंदात राहणाऱ्या या कुटुंबासाठी मात्र मंगळवारची रात्र काळरात्र ठरली आहे.

अनंत चव्हाण हे तीन भावांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांचे दोन भाऊ रामचंद्र चव्हाण आणि सुधाकर चव्हाण हे कामानिमित्त बाहेर असतात. हे तीघे भावांचे कुटूंब कोणताही सण एकत्र येऊन साजरा करायचे. पण त्यामध्ये अनंत चव्हाण यांचे कुटुंब नियतीने उद्धवस्त केले आहे. अनंत चव्हाण हे आपले भाऊ आता या जगात नाही आणि भावाची पत्नी, मुलगा, सून, नात या दुर्घटनेत नियतीने हिरावून नेली, त्यामुळे अनंत चव्हाण यांचे भाऊ पुरते कोलमडून गेले आहेत.

एकाच कुटुंबातील पाच जणांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details