महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 29, 2022, 6:50 PM IST

ETV Bharat / state

Barsu Solgaon refinery : बारसू-सोलगाव रिफायनरी परप्रांतीय भूमाफियांच्या हितासाठी, खासदार विनायक राऊतांचा आरोप

बारसू-सोलगाव रिफायनरी (Barsu Solgaon refinery) परप्रांतीय भूमाफियांच्या हितासाठी असल्याचा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut alleges) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना लक्ष केलं.

Barsu Solgaon refinery
बारसू-सोलगाव रिफायनरी परप्रांतीय भूमाफियांच्या हितासाठी, खासदार विनायक राऊतांचा आरोप

रत्नागिरी :बारसू-सोलगाव रिफायनरी (Barsu Solgaon refinery) परप्रांतीय भूमाफियांच्या हितासाठी असल्याचा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut alleges) यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना विनायक राऊत म्हणाले की, आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची बाजू घेतल्याने तिथल्या ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे काही जणांच्या माध्यमातून आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांना संरक्षण द्या, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यामध्ये काही गैर नाही असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे, ते आज रत्नागिरीत बोलत होते.

बारसू-सोलगाव रिफायनरी परप्रांतीय भूमाफियांच्या हितासाठी, खासदार विनायक राऊतांचा आरोप

परप्रांतीय भूमाफिया रडारवर : रिफायनरी प्रकल्प पुढील 10 वर्ष होणार नाही, मागच्या एका वर्षात बारसू परिसरात 309 लोकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यातील 144 परप्रांतीय भूमाफिया आहेत. मुख्यमंत्र्यांना, उद्योग मंत्र्यांना (Uday samant) रिफायनरीची काळजी नाही, तर 1537 एकर जमीन 309 लोकांनी खरेदी केली आहे, त्यांची काळजी यांना आहे. असा आरोप राऊत यांनी केला.

309 पैकी 144 एकर जमीम परप्रांतीयांनी विकत घेतली आहे. त्यांची तुंबडी भरायची आहे म्हणून खटाटोप सुरू असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. या परप्रांतीयांमध्ये मिश्रा, गुप्ता, शहा आहेत त्यांना बारसूमध्ये कोणी आणले. या परप्रांतीयाच्या हितासाठी रिफायनरी यांना आणायची आहे, भूमाफीयांची झोळी भरण्यासाठी उद्योग मंत्र्यांचे हे धंदे सुरू आहेत. ग्रामस्थांशी बोलायला त्यांना वेळ नाही, अशी टीका यावेळी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली. तसेच माझ्याकडील ही सर्व माहिती आमदार राजन साळवी यांना देणार असल्याचं खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details