महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासगीकरणाविरोधात पुकारण्यात आलेला बँक कर्मचाऱ्यांचा संप पहिल्या दिवशी यशस्वी - खासगीकरणाविरोधात संप

बँकाच्या खासगीकरणाच्या विरोधात देशातील बँक कर्मचारी संपावर गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बँकाही आज ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. संपाच्या पहिल्या दिवशी बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.

Bank employees strike successful on first day
बँक कर्मचाऱ्यांचा संप पहिल्या दिवशी यशस्वी

By

Published : Mar 15, 2021, 8:06 PM IST

रत्नागिरी - सरकारच्या बँक खासगीकरणाच्या धोरणाविरोधात पुकारलेला बँक कर्मचारी व अधिकारी यांचा दोन दिवसांचा संप पहिल्या दिवशी पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा संघटना प्रतिनिधींनी केला आहे. कोरोनाच्या फैलावामुळे संघटनांची निदर्शने कुठेच झाली नाहीत. परंतु, महाराष्ट्रातून बहुसंख्य शहरांतून संपाची भूमिका स्पष्ट करणारी पत्रके संपकरी कर्मचा-यांनी नागरिकांना वाटली.

देशातील बँक कर्मचारी संपावर

खासगीकरणाविरोधात संप

विद्यमान सरकारने दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली व त्याला आक्षेप घेत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँकीग उद्योगातील नऊ संघटनांच्या शिखर संघटनेने दिनांक १५ व १६ मार्च २०२१ रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला. बंदच्या पहिल्या दिवशी देशभरात व रत्नागिरीमध्येही हा संप पूर्णतः यशस्वी झाला. देशभरातील जवळपास १० लाख बँक अधिकारी व कर्मचारी संपामध्ये सहभागी होते. देशातील बँकींगपैकी जवळपास ७० टक्के व्यवसाय हा सरकारी बँकांमधून हाताळला जातो. नव्वद लाख कोटींच्या आसपास ठेवी व साठ लाख कोटींची कर्ज असा एकूण १५० लाख कोटींचा व्यवसाय आज सार्वजनिक बँकांतून हाताळला जातोय. खाजगीकरणाच्या माध्यमातून व धोरणातून हा व्यवसाय मूठभर कॉपोरेट्सना खुश करण्यासाठी त्यांच्या हाती सोपवणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला ब बैंकींग उद्योगाला परवडणारे नाही. म्हणून बँक बचाओ - देश बचाओ ही घोषणा घेऊन आज बँक कर्मचारी संपावर होते.

१९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण करतांना ठेवलेली उद्दिष्ट्ये अजूनही पूर्ण झालेली नाहीत. अजूनही बँकांच्या शाखा विस्ताराची ग्रामीण भागात गरज आहे. शेती, शेतमजूर व खेडोपाडी विखुरलेला छोटा - मोठा व्यावसायिक यांना बँकेच्या सुविधांची व आपल्या विकासासाठी कर्जाची गरज आहे. उद्या जर का सरकारी बँका, खासगी उद्योजक व उद्योग समूह यांच्या हाती गेल्या तर भागणार नाहीत व हाच वर्ग बँक खाजगीकरणामुळे या बँकींगच्या सर्व सेवांपासून वंचित राहील. खाजगी बँकांतील बचत खात्यातील किमान शिल्लक तसेच खात्यावर आकारले जाणारे सुप्त चार्जेस हे सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी बँकीग खूप दूर राहील तसेच खाजगी मालक म्हणजेच उद्योजक किंवा उद्योग समूह बँकांतील ठेवरुपी पैसा स्वतःच्या व्यवसायासाठी व उद्योगांसाठी कर्जरुपाने वापरण्याचा धोका आहे . त्यामुळे सर्वसामान्यांची बचत सुरक्षित राहणार नाही आणि म्हणूनच बँकींग उद्योगाला वाचविण्यासाठी व सामान्यांच्या बचतीच्या सुरक्षिततेसाठी आज व उद्या बँक कर्मचारी संपावर असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.

या संपामध्ये अधिकारी वर्गाच्या चार संघटना व कर्मचारी वर्गाच्या पाच संघटना अशा एकूण नऊ संघटना व बँकींग उद्योगातील शंभर टक्के कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण देशातील व राज्यातीलही बँकिंग उद्योग ठप्प राहील. सरकारने आपल्या बँक खासगीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करावा व ते रद्द करावे अन्यथा या संपानंतर हे आंदोलन आणखी तिव्र केलं जाईल असा इशारा संघटना प्रतिनिधींनी दिला.

हेही वाचा - बँक कर्मचारी संघटनांच्या संपांने देशामध्ये बँकांचे कामकाज विस्कळित

ABOUT THE AUTHOR

...view details