महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत बंजारा समाजाने वीर जवानांना वाहिली श्रद्धांजली - terror attack

जिल्ह्यातील दापोलीत आज एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेल्या बंजारा समाजाने पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

ratnagiri

By

Published : Feb 15, 2019, 8:26 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील दापोलीत आज एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेल्या बंजारा समाजाने पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

ratnagiri

पुलवामामध्ये गुरुवारी अतिशय क्रूरतेने दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास ४५ जवानांना वीरमरण आले. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना देशभर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.


दापोलीतही संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेल्या बंजारा समाजाने या हल्ल्याचा निषेध करत जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बंजारा समाजाचे अनेक समाजबांधव, महिला, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details