रत्नागिरी - शासनाने 2012 साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित 54 वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री सामंत पुढे म्हणाले, 2012 च्या एका निर्णया द्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल. तसेच ज्या गावाची लोकसंख्या 5 हजार पेक्षा जास्त आहे, आणि ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत आहे, अशा ग्रामपंचायतीमध्ये किमान 2 हजार पुस्तकांचे अभ्यासिका ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 15 ते 20 दिवसांत होईल, असेही सामंत यांनी यावेळी जाहीर केले.
हेही वाचा -दहशतवाद्यांशी संबध असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी एनआयए करणार