महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बाळासाहेब ठाकरेंमुळेच सेनेला कोकणात मतं मिळतात; उद्धव ठाकरेंमुळे नाही'

कोकणात शिवसेनेला आज जी मतं मिळतात, ती दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळतात, उद्धव ठाकरे यांच्यामुळे नाही, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

former MP Nilesh Rane
निलेश राणे

By

Published : Feb 3, 2021, 6:03 PM IST

Updated : Feb 3, 2021, 6:54 PM IST

रत्नागिरी -कोकणात शिवसेनेला आज जी मतं मिळतात, ती दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळतात, उद्धव ठाकरे यांच्यामुळे नाही, उद्धव ठाकरे यांच्यामुळे मतं मिळत असती तर विनायक राऊत कधी खासदार झाले नसते, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी आज रत्नागिरीत केली. निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा रत्नागिरी भाजपच्यावतीने आज जंगी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

माजी खासदार निलेश राणे

हेही वाचा -''ते शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत'', रिहानाला उत्तर देताना बरळली कंगना

यावेळी व्यासपीठावर दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अ‌ॅड दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, दक्षिण रत्नागिरी जिल्हा महिला संघटक ऐश्वर्याताई जठार, अ‌ॅड बाबासाहेब परुळेकर, सचिन वहाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शर्जील उस्मानी याने हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचाही राणे यांनी समाचार घेतला.

हेही वाचा -दिल्लीत किल्लाबंदी का केली जातेय? राहुल गांधींचा मोदींना सवाल

मुंबई महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा

मुंबई महापालिकेने कोरोनाच्या काळात दिलेल्या काही ठेक्यावरूनही निलेश राणे यांनी पालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या मुलाला जेवणाचे ठेके दिले. तसेच मास्क, सॅनिटाइझर बनवण्याचं काम फिल्म इंडस्ट्रीमधील काही कलाकारांना दिलं ज्यांनी कधी सॅनिटाइझर बनवलं नाही, पण हे कोणामुळे ठेके देण्यात आले तर आदित्य ठाकरेंमुळे ठेके देण्यात आल्याचा घणाघात राणेंनी यावेळी केला.

सीसीटीव्ही, सिडीआर रिपोर्ट गेले कुठे? - राणे

हे सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचार करत आहे, मर्डर केस लपवत असल्याचा घणाघातही राणेंनी यावेळी केला. सुशांतसिंहच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं आहे. या केसमधले सगळे सीसीटीव्ही, सिडीआर रिपोर्ट गेले कुठे? सीबीआय तपास घेईल याचा, पण यांनी काय शिल्लक ठेवलं तर घेईल, सत्ता तुमची आहे मग मस्ती कसली आली, असा जोरदार शाब्दिक प्रहार राणेंनी यावेळी शिवसेनेवर केला.

Last Updated : Feb 3, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details