रत्नागिरी -सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या 'अर्सेनिक अल्बम ३०' गोळ्या घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार नवी मुंबईचे माजी महापौर अविनाश लाड यांच्याकडून राजापूर विधानसभा मतदारसंघात मोफत गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
Coronavirus : अविनाश लाड मोफत वाटणार 'अर्सेनिक अल्बम ३०' गोळ्या
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
Avinash Lad
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळं रोगप्रतिकारक गोळ्या मोफत वाटण्याचा निर्णय लाड यांनी घेतला आहे.
मतदारसंघातील घरांमध्ये होमिओपॅथी 'अर्सेनिक अल्बम ३०' या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. नवी मुंबईतून या गोळ्या राजापूरमध्ये पाठवण्यात आल्या असल्याची माहिती अविनाश लाड यांनी दिली आहे.