महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा काही लोकांचा डाव' - attempt-to-break-the-co-operative-sector -uday-samant

अनिल देशमुख हे दिल्लीला का गेले याची मला माहिती नाही. पण ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी ते सक्षम आहेत. अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

By

Published : Jul 3, 2021, 4:36 PM IST

रत्नागिरी - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी हजर रहाण्याचे समन्स पाठले आहे. त्यानंतर अनिल देशमुख दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या प्रकरणावर शिवसेना उपनेते तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख हे दिल्लीला का गेले याची मला माहिती नाही. पण ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी ते सक्षम आहेत. या सर्व चौकशी संदर्भातील जी काही भावना आहे ती जनतेला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली. ते आज रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे आले असताना, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

'सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा काही लोकांचा डाव'

सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामाचा आहे. या कारखान्यावर ई़डीने कारवाई केली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इतर 54 साखर कारखान्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच, याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचेही पाटील म्हणाले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा काहींचा डाव आहे. त्याच मानसिकतेतला हा एक भाग आहे, असही सामंत म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details