रत्नागिरी : बंदोबस्ताचे जाणारे वाहन रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला आहे. यात 17 पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम पावस आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले : या अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात रोहित साळवी, किशोर साळवी, निलेश सोनवणे, प्रसाद सोनवणे, मनोज लिंगायत, उदय मोनले, हनुमंत नलावडे, आनंद देसाई, पंकज वदार, विजय आम्रे, अमोल गायकवाड, सुबोध मडगावकर, विष्णू भोये, विजय कलगुटके, विलास घोगले, उमेश खाडेकर, शिवम अंबोलकर या कर्मचाऱ्यांना या दुखापत झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.
अपघाताचे कारण सध्या अस्पष्ट : जखमींना रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारपासून रत्नागिरीत माती सर्वेक्षण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकल्पाला विरोध करणारे काही स्थानिक लोक परिसरातील सर्वेक्षणाच्या ठिकाणी जमले आहेत. वाहन पलटी होण्यामागचे कारण सध्या समजू शकलेले नाही. वाहनाचा वेग जास्त होता का, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्य आहे.
सकाळी 9.30 घडला अपघात : रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सुरक्षेच्या ड्युटीसाठी पोलिसांना घेऊन जात होते. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही घटना नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेळी गावाजवळ आज सकाळी 9.30 वाजता घडली, असे त्यांनी सांगितले. प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या संदर्भात बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचार्यांना घेऊन राजापूरला जात असताना हे वाहन उलटले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा :Fire in Nagpur : हिंगणा एमआयडीसीतील भीषण आगीत तिघांचा जळून मृत्यू, आणखी १० ते १२ कामगार अडकल्याची भीती