रत्नागिरी - आमच्या दृष्टीने नाणार रिफायनरी हा विषय संपलेला आहे. रिफायनरी समर्थनासाठी जे लोक मोर्चे काढत आहेत, त्यांत मोठ्या प्रमाणात दलाल असल्याचे कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी म्हटले आहे.
रिफायनरी समर्थनाच्या मोर्चात मोठ्या प्रमाणावर दलाल, अशोक वालम यांचा आरोप - refinery
नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे जे गुंतवणूकदार आहेत, ते दलालांच्या मानेवर बसले आहेत आणि त्यांच्याकडून पैसे परत मागू लागले आहेत. म्हणून त्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी दलालांचा हा खटाटोप चालला आहे.
राजापूरमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यासंदर्भातील अध्यादेशही रद्द करण्यात आला आहे. एकूणच हा प्रकल्प इथे होणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे जे गुंतवणूकदार आहेत, ते दलालांच्या मानेवर बसले आहेत आणि त्यांच्याकडून पैसे परत मागू लागले आहेत. म्हणून त्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी दलालांचा हा खटाटोप चालला आहे. जनतेला खोटी आश्वासने देऊन, त्यांची फसवणूक करून त्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विनाकारण आपली शक्ती वाया जाऊ नये यासाठी आम्ही आजचा प्रतिमोर्चा रद्द केला आहे. भविष्यात सरकारने हा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केलाच, तर आम्ही आमची शक्ती दाखवून देऊ, असेही अशोक वालम यांनी म्हटले आहे.