रत्नागिरी - रत्नागिरी येथे आशा वर्कर्स युनियनच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आशा महिला उपस्थित होत्या. आशा महिलांना दरमहा अठरा हजार किमान वेतन आणि गतप्रवर्तक महिलांना दरमहा 25 हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन रत्नागिरी जिल्हा प्रशासनास देण्यात आले. यावेळी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना राज्य सरचिटणीस कॉ सुमन शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पल्लवी पारकर, मनाली कदम, अंकिता शिंदे, जोत्स्ना झिबरे, प्रतीक्षा खेडकर, सरिता तिवडेकर यांच्यासह शेकडो आशा महिला उपस्थित होत्या.
रत्नागिरीत आशा वर्कर्सची जोरदार निदर्शने, घोषणाबाजीने जिल्हा परिषद परिसर दणाणला
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रशासनास निवेदन देऊन आशा महिलांना दरमहा अठरा हजार किमान वेतन आणि गतप्रवर्तक महिलांना दरमहा 25 हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रभर आशा व गट प्रवर्तक 3 सप्टेंबर2019 पासून आंदोलन करीत आहेत. 4 सप्टेंबर2019 पासून राज्यातील 70 हजार आशा व 13 हजार गटप्रवर्तक महिलानि संपूर्ण कामकाज वर बहिष्कार घातला आहे. काम बंद आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रतील आशांना व गट प्रवर्तक महिलांना सरकारने मानधन तिप्पट करण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनचा शासन निर्णय GR काढण्यात यावा. आज आशांना दररोज आठ तास काम करूनही कामाचा मोबदला सरासरी 2500 रु फक्त मिळतात. तर गट प्रवर्तक महिलांना दरमहा 8725 रुपये फक्त प्रवास भत्ता मिळतो. हे शोषण थाबवा. आशा व गट प्रवर्तक ना शासन सेवेत कायम करा. तो पर्यंत अंगणवाडी सेविका इतके मानधन द्या. आंध्रप्रदेश सरकार आशांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देते तर महाराष्ट्र सरकार का देत नाही? हा जाब विचारला जातो आहे.
या पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय राज्य कृती समितीच्या पदाधिकारी कडून जाहीर केला आहे. राज्यभर 9 सप्टेंबर रोजी सर्व आशा व गट प्रवर्तक तीव्र आंदोलन करतील. तसेच 10 सप्टेंबर रोजी विदर्भातील सर्व जिल्यातील आशा नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करतील. शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना राज्य सरचिटणीस कॉ. सुमन शंकर पुजारी ,राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले, आशा कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक कॉ. शंकर पुजारी यांनी आवाहन केले आहे.