महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजापूरमधील उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन

राजापूर जवळच्या उन्हाळे गावातील गंगातीर्थ क्षेत्र म्हणजे राज्याच्या कानाकोपर्‍यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान. राजापूरची ही गंगा अनेकांसाठी गुढ मानली जात आहे. गंगा अवतरली की अनेकजण येथे दर्शनासाठी येत असतात. येथील गोमुखातून गंगेचं पाणी येते. येथील गंगा कुंडात 10 नद्यांचं पाणी येतं, असं सांगितलं जातं. गंगा आली की येथील 14 कुंडात पाणी असते.

Rajapur
राजापूर

By

Published : May 1, 2021, 6:57 PM IST

रत्नागिरी -राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे आगमन झाले आहे. सलग दुसर्‍या वर्षी लॉकडाऊनच्या काळात गंगामाईचे आगमन झाले. उन्हाळे तीर्थक्षेत्री गुरुवारी रात्री उशीरा गंगामाईचे आगमन झाले. चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहित होत आहे.

राजापूरमधील उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन

गंगातीर्थ लाखो भक्तांचे श्रद्धास्थान

राजापूर जवळच्या उन्हाळे गावातील गंगातीर्थ क्षेत्र म्हणजे राज्याच्या कानाकोपर्‍यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान. राजापूरची ही गंगा अनेकांसाठी गुढ मानली जात आहे. गंगा अवतरली की अनेकजण येथे दर्शनासाठी येत असतात. येथील गोमुखातून गंगेचं पाणी येते. येथील गंगा कुंडात 10 नद्यांचं पाणी येतं, असं सांगितलं जातं. गंगा आली की येथील 14 कुंडात पाणी असते.

एका वर्षांनंतर पुन्हा आगमन

गंगामाईचे गतवर्षी 15 एप्रिल 2020 मध्ये आगमन झाले होते. त्यानंतर अनेक दिवस वास्तव्य केल्यानंतर 21 जून रोजी गंगामाईचे निर्गमन झाले होते. त्यानंतर गंगास्थानी शुकशुकाट पसरलेला होता. त्यानंतर 29 एप्रिलच्या रात्री गंगामाईचे उन्हाळे गंगातीर्थस्थानी आगमन झाले. गंगामाई चांगली प्रवाहित होत असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गायमुखही सध्या प्रवाहित आहे. गंगामाईच्या पाण्याने पवित्र स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविक मोठ्यासंख्येने गंगेच्या वास्तव्याच्या काळात या ठिकाणी येतात. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात 15 एप्रिल रोजी गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर यावर्षी 29 एप्रिल रोजी गंगामाईचे आगमन झाले. वर्षभरामध्ये एकाच महिन्यामध्ये चौदा दिवसांच्या फरकाने गंगामाईचे आगमन झाले आहे.

यंदाही भाविकांची स्नानाची संधी नाही

गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने भाविकांना गंगामाईच्या पवित्र पाण्याने स्नान करण्याची संधी हुकली होती. त्या स्थितीमध्ये यावर्षीही बदल झालेला नसून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षीही भाविकांना गंगास्नानाची पर्वणी साधण्याची संधी हुकणार आहे.

हेही वाचा -राजवाडीत 14 ते 44 वयोगटातील 200 लाभार्थ्यांचे प्रतिकात्मक लसीकरण

हेही वाचा -काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांच्या लसीकरणाचा भार उचलावा - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details