महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पॅरा कमांडो जवान विशाल कडव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - पॅरा कमांडो जवान विशाल कडव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विशाल कडव हे मुळचे चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्द गावचे. ते मध्य प्रदेशच्या सागर शहरात लष्करी हवालदार पदावर कार्यरत होते. रविवारी ते दुचाकीवरून मित्रासमवेत कामावरून घरी जात असताना समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी गावात समजताच संपूर्ण पिंपळीखुर्द पंचक्रोशीत शोककळा पसरली.

army soldier vishal kadav cremated with full state honours
पॅरा कमांडो जवान विशाल कडव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By

Published : Feb 26, 2020, 4:42 AM IST

रत्नागिरी- मध्य प्रदेशमध्ये मराठा बटालियनात पॅरा कमांडो म्हणून काम करत असलेले जवान विशाल कडव यांचा अपघाती मृत्यू झाला. सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर त्यांचे पार्थिव आणण्यात आल होतं. यानंतर मंगळवारी सकाळी पिंपळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, डीवायएसपी नवनाथ ढवळे, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल कडव हे मुळचे चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्द गावचे. ते मध्य प्रदेशच्या सागर शहरात लष्करी हवालदार पदावर कार्यरत होते. रविवारी ते दुचाकीवरून मित्रासमवेत कामावरून घरी जात असताना समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी गावात समजताच संपूर्ण पिंपळीखुर्द पंचक्रोशीत शोककळा पसरली.

पॅरा कमांडो जवान विशाल कडव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विशाल कडव यांचं पार्थिव भोपाळवरून मुंबई आणि मु्ंबईतून पिंपळीखुर्द येथे आणण्यात आलं. मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशाल यांचे बारावीपर्यंत शिक्षण झालं होतं. ते १३ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत होते. दोन महिन्यापूर्वी त्यांना बढती मिळाली होती. विशाल यांनी ९ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावली. त्यांचे वडिलही माजी सैनिक आहेत. त्यांच्या पश्चात आई रंजना, वडिल रघुनाथराव तर पत्नी वर्षा, मुलगा शिव असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details