रत्नागिरी- साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी दरवर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. आज मात्र हे नेहमीच गजबजलेले असणारे परिसर निर्जण झाले आहेत.
#COVID 19 : गुढीपाडव्याला गजबजणारा परिसर झाला सामसूम
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवार (दि. 24 मार्च) यांनी संपूर्ण देशात 21 दिवस देशात लॉकडाऊनची घोषणा कली. तद्पूर्वीच महाराष्ट्रात संचारबंदी सुरू झाली. दरम्यान, अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांना रत्नागिरी पोलिसांनी लाठीप्रसादही दिला होता.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवार (दि. 24 मार्च) यांनी संपूर्ण देशात 21 दिवस देशात लॉकडाऊनची घोषणा कली. तद्पूर्वीच महाराष्ट्रात संचारबंदी सुरू झाली. दरम्यान, अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांना रत्नागिरी पोलिसांनी लाठीप्रसादही दिला होता. त्यामुळे आज काहीजण फक्त अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडत होते. आज गुढीपाडवा आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने सकाळी तरी लोकांनी घरी बसणेच पसंत केल्याचे दिसत होते. त्यामुळे दरवर्षी पाडव्याला गजबजणारे परिसर आज मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांची तुरळक गर्दी वगळता निर्जण दिसत होते.
हेही वाचा -रत्नागिरीत फक्त दुचाकींना 'या' वेळेतच मिळणार पेट्रोल