महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीचे अचूक भविष्य सांगा २१ लाख मिळवा, अंनिसचे ज्योतिषांना आव्हान - superstition

लोकप्रबोधनाचा हेतू ठेऊन हे आव्हान दिले असल्याचे अंनिसच्या तर्फे सांगण्यात आले. ज्योतिषांना दिलेल्या प्रश्नावलीत २५ प्रश्न असतील. यात लोकसभा निवडणुकीत पक्षांना मिळणाऱ्या जागा, उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्वाच्या मतदारसंघातील विजयी उमेदवार,असे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

अंनिसचे पदाधिकारी

By

Published : Apr 13, 2019, 1:50 PM IST

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीचे अचूक भविष्य सांगा आणि २१ लाख मिळवा, असे जाहीर आव्हान अंधश्रद्धा निर्मुलन समितीने (अंनिस) ज्योतिषांना दिले आहे. याबाबत अंनिसने बुधवारी पत्रकार परिषद घेतली. हे आव्हान स्वीकारणाऱ्या ज्योतिषांना २५ प्रश्नांची प्रश्नावली पोस्टाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

अंनिसच्या पत्रकार परिषदेत बोलताना कार्याध्यक्ष अविनाश पाटील

देशभरात निवडणुका सुरू आहेत. त्याचबरोबर निवडणुकींचे निकाल सांगणाऱ्या ज्योतिषांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत. या अंधश्रद्धेविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय अंनिसने केला आहे. त्यासाठीच ज्योतिषांना जाहीर आव्हान देण्याचे त्यांनी ठरवले आहे. गेल्यावेळी देखील अंनिसने राज्यातील नामवंत ज्योतिषांना आव्हान दिले होते. हे आव्हान एकाही ज्योतिषाने स्वीकारले नव्हते.


लोकप्रबोधनाचा हेतू ठेऊन हे आव्हान दिले असल्याचे अंनिसच्या तर्फे सांगण्यात आले. ज्योतिषांना दिलेल्या प्रश्नावलीत २५ प्रश्न असतील. यात लोकसभा निवडणुकीत पक्षांना मिळणाऱ्या जागा, उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्वाच्या मतदारसंघातील विजयी उमेदवार, सर्वात जास्त मतांनी निवडून येणार उमेदवार, सर्वाधिक मताधिक्य मिळविणारी महिला उमेदवार, नोटा पर्यायाचा सर्वाधिक वापर करणार मतदारसंघ कोणते असे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.


या पत्रकार परिषदेला समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्यवाह डॉ.नितीन शिंदे, ज्योतिष विश्लेषक प्रकाश घाटपांडे, जिल्हाध्यक्ष विनोद वायंगणकर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details