रायगड - मानवाला काही जखम झाली तर तो बोलून आपली व्यथा दुसऱ्या व्यक्तीस सांगून त्यावर उपाय करू शकतो. मात्र, मुक्या प्राण्याला काही झाले तरी तो आपली व्यथा कुणालाही सांगू शकत नाही. असेच पेण शहरात एका भटक्या श्वानाचे तोंड प्लास्टिक बरणीत तीन दिवसांपूर्वी अडकले होते. त्याच्या तोंडातून ही बरणी काढून प्राणी मित्रांनी त्याला जीवदान दिले आहे.
श्वानाच्या तोंडात अडकलेली बरणी काढण्यात प्राणीमित्रांना यश
पेण शहरातील गोदावरी नगरमध्ये एका भटक्या श्वानाने प्लास्टिकच्या बरणीत खाण्याच्या उद्देशाने तोंड घातले. मात्र त्याचे तोंड या बरणीत अडकले. याच स्थितीत हा श्वान तीन दिवस शहरात भटकत होता.
पेण शहरातील गोदावरी नगरमध्ये एका भटक्या श्वानाने प्लास्टिकच्या बरणीत खाण्याच्या उद्देशाने तोंड घातले. मात्र त्याचे तोंड या बरणीत अडकले. याच स्थितीत हा श्वान तीन दिवस शहरात भटकत होता.
जीव फक्त माणसालाच नव्हे तर मुक्या प्राण्यालादेखील आहे आणि माणुसकी आजही जिवंत आहे. हे जणू आज या जवानांनी दाखवून दिले. अशा प्रकारे कौतुकास्पद काम केल्यामुळे प्राणीमित्र शुभम माने, मंगेश नेने, राजू पिचिका आणि पेण अग्निशमन दलाचे जवान अभिजित गुरव, दर्शन निंबरे, स्वप्नील म्हात्रे आणि सुरज कुरंगले यांचे समस्त पेणकर कौतुक करीत आहेत.