रत्नागिरी -अनिल परब हा मातोश्रीचा एजेंट आहे. त्यामुळे हे सगळे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोचणार, अशी टीका भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली ( Nilesh Rane Criticized Anil Parab ) आहे. ते आज राजापूरमध्ये रिफायनरी स्वागत मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
Nilesh Rane : अनिल परब हा मातोश्रीचा एजंट; निलेश राणेंची टीका
अनिल परब हा मातोश्रीचा एजेंट आहे. त्यामुळे हे सगळे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोचणार, अशी टीका भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली ( Nilesh Rane Criticized Anil Parab ) आहे.
Nilesh Rane
यावेळी राणे म्हणाले की, अनिल परबांसंदर्भातील ईडीच्या कारवाईमध्ये उद्या उद्धव ठाकरे यांना घेतले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. दरम्यान, चंद्रकांत खैरे यांची खासदारकी गेली, त्यामुळे ते सरबरीत झाले आहेत. त्यात आता संजय पवार यांना खासदारकी मिळाल्याने भर पडली आहे. खैरे यांना शिवसेनेत किंमत राहिलेली नाही, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.
हेही वाचा -Nepal Plane Crash : नेपाळमधील बेपत्ता विमानात ठाण्यातील चार प्रवाशी