महाराष्ट्र

maharashtra

आयटी इंजिनिअर असूनही गेल्या 3 वर्षांपासून 'ती' साकारतेय सुबक 'गणेशमूर्ती'

By

Published : Aug 23, 2019, 9:24 PM IST

सामान्यपणे गणेशमुर्ती तयार करण्यात अनेक ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी पहायला मिळते.मात्र, रत्नागिरीतील एका मूर्तीशाळेत एक उच्चशिक्षित तरुणी गणेशमूर्ती बनवत आहे.आयटी इंजिनिअर असलेली कश्मिरा सावंत अतिशय सुबक आणि देखण्या  गणेशमूर्ती तयार करते.

कश्मिरा सावंत

रत्नागिरी - गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. सर्व गणेश भक्तांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. मूर्तीशाळांमध्येही सध्या लगबग दिसून येत आहे. कारागीर मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. रत्नागिरीतील एका मूर्तीशाळेत एक उच्चशिक्षित तरुणी गणेशमूर्ती बनवत आहे.

आयटी इंजिनिअर असूनही गेली 3 वर्ष 'ती' साकारते सुबक 'गणेशमूर्ती'
आयटी इंजिनिअर असलेली कश्मिरा सावंत अतिशय सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती तयार करते. सामान्यपणे गणेशमूर्ती तयार करण्यात अनेक ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी पहायला मिळते. पण कश्मिराने ही मक्तेदारी मोडीत काढली आहे. मागील तीन वर्ष सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती तीने साकारल्या आहेत.कश्मिरा पुर्णपणे शाडूच्या मुर्ती साकारते. यावर्षी कश्मिराने साकारलेल्या गणेशमूर्ती मुंबई, पुणे, कर्नाटकात जाणार आहेत. गणेशमूर्तीमधील जिवंतपणा कश्मिराच्या हातच्या कलेतून सहज साकारला जातो. गणरायाच्या अंगावरील दागिने सजवण्यात कश्मिराचा हातखंडा आहे. त्यामुळे काहींना खास तिच्याच हातून साकारलेली गणेशमूर्ती हवी असते.आयटी इंजिनिअर असलेली कश्मिरा नोकरी न करता गणपतीच्या मुर्ती साकारते. इतरांपेक्षा आपली मुलगी काहीतरी वेगळ करत असल्याने कश्मिराचे आई-वडिल सुद्धा कश्मिराला पाठिंबा देतात.

ABOUT THE AUTHOR

...view details