रत्नागिरी- दापोली आणि मंडणगड तालुक्यातील अनेक गावे निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडली. यात घरांचे, शेतीची मोठे नुकसान झाले आहे. मंडणगड तालुक्यातील आंबवणे बुद्रुक गावाचेही या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, गावाला तातडीची कोणतीही मदत मिळालेली नाही.
निसर्ग चक्रीवादळ : नेत्यांचे दौऱ्यावर दौरे.. मदत मात्र अद्याप नाही
नुकसानग्रस्त आंबवणे बुद्रुक गावात अधिकारी, राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे झाले. मात्र, अद्याप कोणतीही तातडीची मदत इथे पोहचलेली नाही. महसूल विभाकडून फक्त 16 निराधारांना धान्य देण्यात आले आहे. कोरोनामुळे अगोदरच दोन महिने रोजगार नाही. त्यात आता वादळातने नुकसान झाल्याने येथील नागरिकांना लवकर उभारी मिळणे अशक्य आहे.
आंबवणे बुद्रुक गावात जवळपास 250 घरे आहेत. मात्र, 4 ते 5 घरं सोडली तर जवळपास प्रत्येक घराचे या वादळामुळे नुकसान झाले आहे. तसे हे गाव निसर्गसंपन्न आहे. डोंगरभागात वसलेल्या या गावाच्या पायथ्याशी नदी, डोंगरभागात प्रत्येकाची आंबा, काजूची झाडे आहेत. या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर 40 ते 50 टक्के लोकांचा उदर्निवाह चालतो. मात्र, वादळात झाडे उन्मळून पडली. अपार मेहनत घेऊन, पै-पै जमा करून उभी केलेली घरे डोळ्यादेखत वादळात पडली, धान्ये भिजली. ज्या झाडांना पोटच्या मुलांप्रमाणे वाढवले, प्रसंगी पोटाला चिमटा काढून झाडे जगवली, ती आंबा काजूची झाडे या वादळात जमीनदोस्त झाली. गावातील शाळेची इमारतही पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत, मात्र अद्यापही या गावाला कोणतीही तातडीची मदत मिळालेली नाही.
नुकसानग्रस्त या गावात अधिकारी, राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे झाले. मात्र, अद्याप कोणतीही तातडीची मदत इथे पोहचलेली नाही. महसूल विभाकडून फक्त 16 निराधारांना धान्य देण्यात आले आहे. कोरोनामुळे अगोदरच दोन महिने रोजगार नाही. त्यात आता वादळातने नुकसान झाल्याने येथील नागरिकांना लवकर उभारी मिळणे अशक्य आहे. त्यांना आता शासनाच्या मदतीची आशा आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा परिस्थितीत आम्ही सर्व कसे नव्याने उभे करायचे, अशी भावना या गावातील एका तरुणाने ईटीव्ही भारतशी बोलताना मांडली. तसेच सध्या घरे तात्पुरती राहण्यासाठी कशीतरी डागडुजी केलेली आहे. मात्र, पावसानंतर ती पुन्हा व्यवस्थित करावी लागतीलच त्यासाठी आम्हाला ठोस मदत मिळावी, अशी अपेक्षाही या तरुणाने व्यक्त केली. आपल्या 73 वर्षांच्या आयुष्यात असे वादळ आपण पाहिले नसल्याचे येथील एक वृद्ध नागरिकाने सांगितले.