रत्नागिरी -शिवसेनेची अनेक नेते मंडळी तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार राजन साळवी यांना रिफायनरी प्रकल्प हवा आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीदेखील या प्रकल्पाच्या बाजूने आहे. त्यामुळे हा प्रकल्प राजापूरमध्येच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे वक्तव्य भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'प्रकल्प सर्वांनाच हवा आहे' -
हा प्रकल्प सर्वांनाच हवा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना आशा सर्वांनाच हा प्रकल्प हवा आहे. दरम्यान, कोयनेचे फुकट जाणारं पाणी कोकणात फिरवा, रिफायनरीच्या माध्यमातून हे पाणी कोकणात फिरवा आणि पाण्याचा बॅकलॉक दूर करा, असे जठार यावेळी म्हणाले.