महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसे नगराध्यक्ष शिवसेनेच्या रडारवर, कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप - Shiv Sena Leader Ramdas Kadam

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी 'क' वर्ग असणाऱ्या खेड नगरपालिकेत लाखो रुपयांचा डिझेल घोटाळा केला आहे. त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत इतर कोटयावधी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

खेड
खेड

By

Published : Jan 28, 2021, 5:00 PM IST

Updated : Jan 28, 2021, 6:13 PM IST

रत्नागिरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर विविध अकरा घोटाळ्यासंदर्भात शिवसेनेने अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि नगरविकास मंत्रालयातील सचिवांकडे सादर केला आहे. वैभव खेडेकर हे मनसेचे महाराष्ट्रातील एकमेव नगराध्यक्ष आहेत.

मनसे नगरध्यक्ष शिवसेनेच्या रडारवर

नगराध्यक्ष खेडेकर यांनी 'क' वर्ग असणाऱ्या खेड नगरपालिकेत लाखो रुपयांचा डिझेल घोटाळा केला. आपल्या अधिकारांचा गैरवापर करत इतर कोटयावधी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात खेड नगर परिषदेमधील शिवसेनेच्या नगरसेवक आणि गटनेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला आहे.

11 कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप -

खेड नगर पालिकेत नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी कोटयावधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये हे समोर आल्याचा दावा शिवसनेने केला आहे. नगर पालिका वाहनांव्यतिरिक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांमध्ये देखील बेसुमार डिझेल भरले गेले असून गेल्या तीन वर्षात 77 लाखांचा डिझेल घोटाळा केला गेला असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या बंद असलेल्या वाहनांचे नंबर दाखवून देखील हजारो लिटर डिझेल खतावले गेले असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मनसे-शिवसेनेतील संघर्ष तीव्र -

डिझेल घोटाळ्याबरोबरच शहराच्या विविध विकास कामांच्या अंतिम बिलांवर नगराध्यक्षांनी एकट्याच्या सहीने रक्कम अदा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यांसह एकूण 11 घोटाळ्यांची माहिती पुराव्यांसह खेड नगर पालिकेतील 9 नगरसेवकांच्या सहीने गटनेत्यांच्या मार्फत रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे सादर करत खेडेकर यांच्या अपात्रतेबाबत प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणामुळे मनसे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jan 28, 2021, 6:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details