महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत मेडिकल वगळता सर्व दुकाने राहणार बंद; नागरिकांना आता घरपोच सेवा देण्याचे आदेश - रत्नागिरी कोरोना घडामोडी

गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाने मोठ्या संख्येने लोक बाहेर पडताना आढळत आहेत. ही बाब चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणि कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी
रत्नागिरी

By

Published : Apr 16, 2021, 4:19 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मेडिकल वगळता इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेच्या दुकानदारांना आता घरपोच सेवा किंवा सामान पुरवावं लागणार आहे. किराणा, भाजी, दूध नागरिकांना घरपोच दिले जाणार आहे. रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय अनेकांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे उद्यापासून मात्र याची अगदी कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

रत्नागिरीतील कोरोना स्थितीचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1 हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाने मोठ्या संख्येने लोक बाहेर पडताना आढळत आहेत. ही बाब चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणि कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच भाजी व्यावसायिकांनाही आपली कोरोना चाचणी करून, चाचणी निगेटिव्ह आल्यास भाजी दुकान सुरू ठेवता येणार आहे. मात्र, चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे लागणार आहे. तसेच औषध दुकानदारांनाही कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान किराणा दुकानदार, दूधवाले आणि बेकरी यांना आता होम डिलिव्हरी देणे बंधनकारक राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details