रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीर जिल्ह्यामधील सर्व हॉटेल्स, दुकाने व आस्थापने बंद करण्यात आली आहेत. मात्र, असे असले तरी जीवनावश्यक वस्तू व भाजीपाल्यांची दुकाने सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपही सुरू राहतील, त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची गरज नाही, त्यांना पेट्रोल उपलब्ध राहील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.
रत्नागिरीत पेट्रोल पंप राहणार सुरू; नागरिकांनी गर्दी न करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन - petrol open ratnagiri
पेट्रोल पंप सुरू ठेवण्याबाबतच्या स्पष्ट सूचना पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी यासंदर्भात कुठलाही गोंधळ मनात ठेवू नये, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
![रत्नागिरीत पेट्रोल पंप राहणार सुरू; नागरिकांनी गर्दी न करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन corona ratnagiri](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6472117-thumbnail-3x2-op.jpg)
पेट्रोल पंप
पेट्रोलपंप सुरू ठेवण्याबाबतच्या स्पष्ट सूचना पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी यासंदर्भात कुठलाही गोंधळ मनात ठेवू नये, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा-कोरोना इफेक्ट : 400 वर्षांत पहिल्यांदाच 'या' शहरातील विठोबा मंदिराचे दरवाजे बंद