महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी : देवस्थानांचे कर्मचारी व पुजाऱ्यांची होणार कोरोना चाचणी - ratnagiri temple news

कर्मचारी, पुजारी व तेथील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

all-members-of-pilgrimages-will-be-tested-in-ratnagiri
रत्नागिरी : देवस्थानांचे कर्मचारी व पुजाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

By

Published : Nov 25, 2020, 10:46 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांचे कर्मचारी, पुजारी व तेथील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. पर्यटन तसेच मंदिरे उघडण्याला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का असेना कोरोनाकाळातील नियमांना पर्यटकांकडून हरताळ फासल्याचे देखील दिसून आले. या साऱ्या बाबींचा विचार करत जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांचे कर्मचारी आणि पुजारी तसेच तेथील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
गणपतीपुळेतील 30 कर्मचाऱ्यांची तपासणी -गणपतीपुळे येथील 30 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये एकही जण कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. त्यानंतर आता जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी देखील अशाच प्रकारे तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढल्याने देवस्थानाचे कर्मचारी तसेच पुजाऱ्यांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details