रत्नागिरी- जिल्ह्यात देखील वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता देणार असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अफेरेसीस युनिटचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी ऑनलाईन उद्घाटन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. तसेच कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही. यासाठी (MAH)अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी शपथ सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
'मास्कच सध्या एकमेव लस.. रत्नागिरीतही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मदत करणार'
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अफेरेसीस युनिटचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी रत्नागिरीला वैद्यकीय महाविद्यालय सुरू कऱण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कोरोनावर मास्कच सध्या एकमेव लस असल्याचे ते म्हणाले.
अफेरेसीस युनिटचा इतर रोगांमध्येही फायदा
प्लाझमा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे 1 ते 2 लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी अभिनंदन देखील टोपे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. तसेच याबाबत उद्घाटनानंतर ित्रफित दाखविण्यात आली.