रत्नागिरी -जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अजूनही पावसाची बरसात सुरूच आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. मात्र, पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेही वाचा -परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग; तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान
गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात शेती आणि अन्य पिकांची नासाडी झालेली आहे. शेतात कापलेले पीकही वाया गेले आहे. तर शेतात उभे असलेले पीकही पावसामुळे काढता येत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
हेही वाचा -धनत्रयोदशीला सोने 'फिक्के'; विक्रीत सुमारे ४० टक्के घसरण
दरम्यान, गेल्या 24 तासात सरासरी 34.36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यात झाला आहे. या तिनही तालुक्यांमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही तर शेतकऱ्याचे आणखी मोठे नुकसान होणार आहे.